-
Sale!A wonderful collection of six books that introduce children to the most loved goddesses of Hindu religion. Each book narrates the circumstances that led to the birth of the goddess, and how they rescued mankind from evil forces. The simple language and classy illustrations hold the little readers’ attention and inspires them to read more and more about these glorious, revered and inspiring heavenly beings.
-
डिजिटल युगामध्ये तंत्रज्ञान फारच व्यापक झालं आहे. हे पुस्तक वाचकांना एकाग्रता व डिजिटल जीवनामध्ये स्वनियंत्रण मिळवण्यासाठी दिशा देईल. - आर्थी सुब्रमनियम टाटा सन्सचे समूह प्रमुख डिजिटल ऑफिसर. 'द आर्ट ऑफ फोकस' हे पुस्तक आपल्याला अंतरंगाच्या प्रवासाला घेऊन जाते. आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजायला मदत करते. जेव्हा एखादी व्यक्ती हा अर्थ अंतरंगातून जाणून घेते तेव्हाच ती बाह्य जगामध्ये परिवर्तन आणू शकते. - आदित्य नटराज, पिरामल फाऊंडेशनचे सीईओ - 'द आर्ट ऑफ फोकस' हे पुस्तक फक्त आपल्याला मानसिक स्वास्थाविषयी प्रशिक्षितच करत नाही तर त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आध्यात्मिक स्वास्थ्यावर एकाग्रता करण्यासाठी प्रेरितही करते. - संगीता रेड्डी, अपोलो हॉस्पिटल ग्रुपच्या सह व्यवस्थापकीय संचालक - 'द आर्ट ऑफ फोकस' हे पुस्तक तीन पुस्तकांच्या मालिकेतील दुसरं पुस्तक आहे. अतिशय प्रभावी अशा ४५ कथांच्या माध्यमातून वाचकांना त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी पडतील असे मानवी गुण यामधून व्यक्त केले आहेत. याच मालिकेतील पहिलं पुस्तक 'आर्ट ऑफ रेझिलियन्स' म्हणजेच लवचीकता. या पुस्तकाने कोव्हीड १९ च्या काळात निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये लोकांना लवचीकतेच्या आधारे मार्ग काढण्यासाठी प्रेरित केलं. 'द आर्ट ऑफ फोकस' हे पुस्तकही एकाग्रतेच्या माध्यमातून मनाला एक नवी उभारी देते. हे पुस्तक लोकांना त्यांच्या जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडण्यास व आयुष्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल.
-
गौरांग दास हे माझे आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. ज्या लोकांना प्राचीन ज्ञान आत्मसात करायचं आहे तसंच जे जीवनातील अनिश्चिततेमधून मार्ग काढत आहेत व योदध्याच्या मानसिकतेतून लढत आहेत, त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं. रणवीर अल्लाहवदिया, सोशल मीडिया एंटरप्रेन्युअर, यूट्यूबर, लीडरशिप कोच चांगल्या सवयी लावणं सोपं नाही. पण गौरांग दासजींसारख्या जाणकार व विद्वान लेखकांनी त्यांच्या कथा सांगण्याच्या प्रभावी शैलीतून हे कसं करायचं हे आपल्याला सांगितलं आहे. - कैलाश खेर, संगीत संयोजक आणि गायक कथा आणि उदाहरणांनी परिपूर्ण असलेलं हे पुस्तक वाचल्यानंतर दीर्घकाळ वाचकांच्या स्मरणात राहतं. हिमांशू गौतम, सफलता. कॉमचे सीईओ ज्याला सतत प्रगती करत वैयक्तिक आणि व्यावहारिक जीवनामध्ये आपला वेगळा ठसा उमटवायचा आहे अशा प्रत्येक महत्त्वाकांक्षी भारतीय तरूणासाठी आवश्यक पुस्तक. - डॉ. भीमराया मैत्री, डायरेक्टर, आयआयएम नागपूर कोविड १९ च्या महामारीनंतर जगामध्ये इतकं परिवर्तन आलं आहे की, आता आपण प्रत्येक घटनेकडे कोविडच्या पूर्वी आणि कोविडच्या नंतर या संदर्भातून पहात असतो. आपण सर्वच जण या नव्या जीवनामध्ये स्वत: ला स्थापित करत असल्यामुळे व आपणच याचे अग्रदूत असल्याने सवयींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. आर्ट ऑफ रेझिलियन्स आणि आर्ट ऑफ फोकस या दोन पुस्तकांनंतर याच शृंखलेमधील आर्ट ऑफ हॅबिट्स हे तिसरं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये ४० कथा दिलेल्या आहेत व प्रत्येक कथेमधून आपल्याला जीवनातील विविध बाबी उलगडत आहेत. वाचकांना भुरळ घालणारी गोष्ट म्हणजे कथांची आकर्षक मांडणी, त्याचं आजच्या काळातील महत्त्व आणि त्यातून मिळणारं मौल्यवान ज्ञान.
-
शतकानुशतके मानवी जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी पुस्तके हे माध्यम आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी आज आपण पाहतोय की सनातन किंवा हिंदू धर्माबाबत लोकांच्या मनात अनेक संभ्रम आणि शंका आहेत. श्री प्रतीक देसाई यांनी लिहिलेले “हिंदू धर्म (संशय निर्मूलन)”, अध्यात्म, सनातन किंवा सामान्यतः हिंदू धर्म याविषयी लोकांना पडणाऱ्या अत्यंत वेधक, वादग्रस्त आणि नियमितपणे विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे देतो. हिंदू धर्माबद्दल लोकांचे अनेक गैरसमज दूर करून हे पुस्तक हिंदू धर्माचा खरा अर्थ आणि सार प्रकट करते. सर्वांना ते समजावे म्हणून पुस्तक अतिशय स्पष्ट भाषेत प्रश्न-उत्तर स्वरूपात सादर केले आहे. पुस्तकात विचारलेले काही प्रश्न असे आहेत – 1) देवाने इतके धर्म का निर्माण केले जे हिंसाचाराला कारणीभूत ठरतात 2) गरजू आणि गरीबांना देण्याऐवजी देवाला दान का करावे 3) जर देव एक असेल तर सर्व मार्ग देवाकडे नेतात. त्याच देवाकडे नेऊ नका? ४) भक्तांना देवाचे दर्शन का होत नाही? … आणि बरेच काही
-
Sale!The Gita is replete with spiritual wisdom. However, it does not appeal to many people, especially children, who fail to understand the meaning and essence of its shlokas. This book strives to get across the meaning of key shlokas from the Gita by presenting them with appropriate stories. The stories have been carefully selected from ancient scriptures, Puranas, epics, and folklore, and are accompanied by eye-catching illustrations